Mon. Aug 10th, 2020

भिवंडीत 12 लाखांचा गुटखा जप्त

ठाणे : भिवंडीतून गुटखा जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत 12 लाख इतकी आहे. भिवंडी शहरातील विठ्ठल नगर येथील दोन बंद गाळ्यातून हा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

ठाणे अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी शंकर राठोड यांना भिवंडी शहरातील विठ्ठल नगर येथे गाळ्यात गुटखा साठवल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नारपोली पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. अन्न सुरक्षा विभागातील सहाय्यक आयुक्त भूषण मोरे, माणिक जाधव, प्रदीप कुटे, गुप्त वार्ता विभागातील अरविंद खडकेंनी या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

बंद गाळ्याचे कुलूप उघडून त्यामध्ये शिखर, पुकार, पान मसाला, सुगंधी तंबाखू असा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. जप्त केलेल्या गुटख्याची एकूण किंमत 12 लाख 14 हजार 268 रुपये इतकी आहे. घटनास्थळावरून फरार असलेल्या अब्दुल्हा अब्दुल खैर खानच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *