Fri. Aug 6th, 2021

मध्यप्रदेशमध्ये वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात, 12 जण जागीच ठार

मध्य प्रदेशमधील उजैनमध्ये 2 कारची समोरासमोर धडक लागून भीषण अपघात झाला आहे. रामगड गावाच्या जवळ मध्यरात्री हा अपघात झाला आहे.

या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यु झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. या अपघातात 3 लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलीसांनी दिलेली माहिती

 • मारुती कारमधील प्रवासी लग्न समारंभ आटपून परतत असताना ही दुर्घटना घडली.
 • समोरुन वेगात येणाऱ्या कारने धडक दिली.
 • या भीषण अपघातात गाडीचे तुकडे लांबपर्यंत उडाले होते.
 • दुसऱ्या कारमध्ये एअरबॅग असल्यामुळे गाडी चालकाचा जीव वाचला, मात्र तो जखमी झाला आहे.
 • त्याला उपचारासाठी इंदूरला पाठवण्यात आलं आहे.
 • एकाच कुटुंबातील 5 जण ठार झाली आहेत.
 • पोलीस अधिकारी नाहर सिंह रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार
 • हेक्सा कार आणि मारुती कार या दोघांची समोरासमोर धडक झाली.
 • मारुती कार नागदावरुन उज्जैनकडे येत होती.
 • तेव्हाच समोरुन येणाऱ्या हेक्सा कारने त्यांच्या गाडीला धडक दिली.
 • हेक्सा कारमध्ये चालक एकटाच होता.
 • या भीषण अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
 • तसेच मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *