फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स

कोरोना काळात अनेकांना वेगवेगळ्या आजाराचा सामना करावा लागत आहे. फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही उपाय हे खालीलप्रमाणे सांगितले आहे. हे उपाय केल्यास फुफ्फुस निरोगी राहु शकते.

१) हर्बल चहा आले, काळी मिरी, वेलची, पुदीन्याची वाळलेली पाने अशा सर्व कोरड्या औषधी वनस्पतींचे मिश्रण करून आपण घरी पावडर तयार करू शकता आणि आपल्या रोजच्या चहामध्ये याचा वापर करू शकता.

२) सोनेरी दुध एक ग्लास गाईच्या दुधामध्ये पाव चमचा हळद ते दुध तीन ते चार मिनिटे उकळवून घ्या. केवळ गरम दुधात हळद घालून न पिता ते उत्तम परिणामांकरिता हळद घातलेलं ते दुध छान उकळवा.

३) वाफ घ्या आपण गरम पाण्यात ओवा घालून त्याची वाफ घेऊ शकता. ज्यामुळे श्वासनलिका उघडण्यासाठी तसेच श्वासोच्छवासातील अडथळा दूर करण्यासाठी नक्कीच फायदा होता.

४) तुळशी, पिंपळ, जेष्ठमध, अडुळसा या औषधी वनस्पती सम प्रमाणात घेऊन तुम्ही याचे चूर्ण तयार करू शकता. हे चूर्ण दिवसातून दोनदा कोमट पाण्यातून सेवन करणे लाभदायक ठरेल.

५) एक लिटर पाणी घेऊन त्यात १/२ चमचा सुंठ पावडर घाला आणि साधारण १५ ते २० मिनिटे उकळवून घ्या. त्यानंतर हे पाणी पूर्णपणे थंड होऊ दया आणि दिवसभर या पाण्याचे सेवन करा.

६) लिंबूवर्गीय फळं जसे द्राक्षे, संत्री, अननस, सफरचंद, डाळींब यांचे सेवन करावे.

७) भोपळा, गाजर, पालेभाज्या, आले, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करा.

८) दररोज पहाटे १ चमचा च्यवनप्राश घ्या.

९) तेलकट, चरबीयुक्त, जंक फूड, बेकरी उत्पादने आणि जड पदार्थ खाणे टाळा.

१०) व्यायाम म्हणजेच फुफ्फुसांचा आहार होय. फुफ्फुसात वायुमार्गाचा प्रवाह सहजरित्या होण्याकरिता व्यायामाची आवश्यकता आहे. दिर्घ श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करा. १५ दीर्घ श्वास घ्या आणि असे ३ वेळा पुन्हा करा. प्राणायामाचे प्रकार – − भ्रामरी प्राणायाम − भस्त्रिका प्राणायाम − अनुलोम विलोम प्राणायाम − कपालभाती प्राणायाम डॉ. सायली मोदी यांच्या म्हणण्यानुसार दिवसात 15 मिनिटे चालणे अथवा जॉगिंग करणे आरोग्यास लाभदायी असते. एका दिवसात ४ ते ५ फुगे फुगवा.

११) नस्य दोन्ही नाकपुडींमध्ये औषधी द्रव्याचे थेंब टाकणे ज्यामुळे फुफ्फुसाचा संसर्ग रोखता येतो.

१२) धूम्रपान आणि तंबाखुचे सेवन टाळा.

Exit mobile version