Fri. Jan 21st, 2022

’12 वी पास पंतप्रधान पुन्हा नको’ – अरविंद केजरीवाल

12 वी पास व्यक्तीला पंतप्रधानपदी पुन्हा निवडू नका, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.  आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेने चूक सुधारावी असेही ते यावेळी म्हणाले. विरोधकांनी आयोजीत केलेल्या सभेत अरविंद केजरीवाल यांनी हे वक्तव्य केले आहे. या सभेच ममता बॅनर्जी, शरद पवार, चंद्राबाबू नायडू असेे नेते उपस्थित होते.

अरविंद केजरीवाल यांची मोदींवर टीका –

गेल्या निवडणुकीत जनतेने 12 वी पास व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवले.

मात्र आगामी निवडणुकीत  12 वी पास व्यक्तीला पंतप्रधानपदी पुन्हा निवडून देऊ नका.

यावेळी सुशिक्षित व्यक्तीला पंतप्रधानपदी संधी द्या.

तसेच पंतप्रधानपद हे मोठे पद आहे. 12 वी पास व्यक्तीला हस्ताक्षर कुठे करायचे माहिती नाही.

त्यानंतर मोदी सरकारच्या काळात राफेल करारात विमानांसाठी जास्त पैसे द्यावे लागले. यासाठी मोदीच जबाबदार असल्याचाही आरोप केजरीवाल यांनी लावला.

राफेल कराराचे सत्य बाहेर आल्यावर मोदींना पंतप्रधानपदावरुन राजीनामा द्यावा लागेल.

केजरीवाल यांनी ममता बॅनर्जींचे केले कौतुक ?

ज्या पद्धतीने सीबीआयच्या कारवाईवरुन ममता बॅनर्जी यांनी टक्कर दिली त्याचे कौतुक केजरीवाल यांनी केले.

पोलीस आयुक्तांना अटक झाली असती तर इतर राज्यांमध्ये केंद्र सरकारपासून घाबरुन रहा असं वाटलं असतं.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *