Fri. Jun 21st, 2019

दिल्लीतील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये भीषण आग, 17 जणांचा मृत्यू

9Shares

दिल्लीतील करोलबाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये पहाटे 4च्या सुमारास भीषण आग लागली होती.

या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 पुरुष, 1 लहान मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे.

आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 26 गाडया घटनास्थळी दाखल झाल्या.

या भीषण आगीतून एकूण 25 जणांची सुटका करण्यात आली.

अर्पित पॅलेस हे हॉटेल 5 मजली आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत बहुतांश मृत्यू गुदमरल्यामळे झाले आहेत.

या आगीतून 25 जणांची सुटका करण्यात आली असून घाबरल्यामुळे दोघांनी इमारतीवरुन उडया मारल्या असे मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आग लागल्याचे समजताच हॉटेलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

तात्काळ उपाय म्हणून हॉटेलच्या काचा फोडण्यात आल्या जेणेकरुन धूर बाहेर जाईल.

9Shares

Leave a Reply

%d bloggers like this: