Mon. Apr 6th, 2020

कॅलिफोर्नियात गोळीबार, 13 जणांचा मृत्यू

अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियात बुधवारी रात्री भर गर्दी असलेल्या एका बारमध्ये एका अज्ञाताने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्लेखोराला सुरक्षारक्षकांनी ठार केले. त्याच्यासह एकूण 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

काउंटीतील शेरीफ यांच्या सर्जंटने ही माहिती दिली. या गोळीबारात शेरीफ यांच्या एका उपअधिकाऱ्यालाही गोळी लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थाउजंड ओक्समध्ये बार अँड ग्रील मध्ये रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी हा गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका माणसाने बंदुकीने अनेक गोळ्या झाडल्या आणि नंतर धुराचा बॉम्ब फोडून पुन्हा गोळीबार सुरू केला. त्याने एकूण 30 गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे.

Embedded video

Joe Curley

@vcsjoecurley

Matt Wennerstrom, 20, of Newbury Park explains what it was like to be in Borderline Bar and Grill tonight when a gunman opened fire.

92 people are talking about this

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *