Sat. May 25th, 2019

पुण्यात खूनी सत्र : 15 दिवसांत 13 हत्या !

143Shares

सुरक्षित शहर अशी खरंतर पुण्याची ओळख… पण या सुरक्षित पुण्याला खुनांच्या मालिकेचं ग्रहण लागलंय.

मागील 15 दिवसात पुण्यात 13 खून झाले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे या 13 खुनातील आरोपींपैंकी 10 आरोपी अल्पवयीन आहेत.

प्रेमप्रकरणांतून खून

पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला.

ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.

सिद्धार्थ कलवडी युवकाचा यात जागीच मृत्यू झाला.

प्रेमप्रकरणातून हा खून झाला असल्याचं तपासात समोर आलं आहे.

घटनेतील आरोपीची बहीण आणि मृत सिद्धार्थचे प्रेम संबंध होते.

आरोपीला हे मान्य नव्हते म्हणून त्याने सिद्धार्थचा खून केला.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पुण्यात 7 जानेवारीपासून आतापर्यंत 13 हत्या झाल्या आहेत.

7 जानेवारी पासून शहराच्या वेगवेगळ्या भागात जवळपास दररोज एक खून होत आहे.

पुण्यातील खूनांची मालिका

 1. वारजात स्मशानभूमीजवळ अनोळखी तरुणाचा खून.
 2. दुसऱ्या दिवशीच पैशांवरुन दहावीतील निखील आंग्रोळकरचा खून.
 3. पर्वती येतील जनता वसाहतीत सराईत गुन्हेगार निलेश वाडकरांचा दुसऱ्या गुन्हेगार टोळीकडून खून.
 4. आंबेगावात व्यवसायिक रकीबचंद ओसवाल यांचा खंडणीसाठी खून.
 5. कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ खुनाचा प्रकार उघडकीस.
 6. सिंहगड रस्त्यावर दारुसाठी पैसे मागितल्याने अल्पवयीन मुलांकडून हरी उर्फ गुंड्याचा खून.
 7. कॅम्प परीसरात दारु पिण्यासाठी बाकड्यावर बसण्याच्या कारणावरून रफीक शेखचा खून.
 8. फुरसुंगी येथील जुन्या भांडणातून मजुरांकडून मंगलसिंग माहुसिंगचा खून.
 9. हडपसर येथे पैशांवरुन राहुल पाटीलचा मित्राकडून खून.
 10. ताडीवाला रोड येथे पित्याकडून पत्नीचा आणि मुलीचा खून.
 11. सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील फनटाईम थिएटर शेजारी तरुणाचा कोयत्याने सपासप वारकरून खून.
 12. 28 तारखेला कर्वेनगर येथे युवकाचा खून.

या सर्व खूनांच्या घटनेत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे खुनांच्या या घटनांमधील आरोपींपैकी 10 आरोपी अल्पवयीन आहेत.

त्यामुळं पोलीसही चिंतेत आहेत. खुनांचे हे सत्र सुरु असतानाच, डेक्कन परीसरात वृद्ध दांपत्याला त्यांच्या राहत्या बंगल्यात काही तास ओलीस ठेऊन त्यांना लुटण्यात आलं.

सराईत तसेच तडीपार गुंडांकडे होणारं दुर्लक्ष यामुळे शहरातील हे हत्येचं सत्र थांबणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *