Jaimaharashtra news

पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 13 नक्षलवादी ठार

गडचिरोली :  जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये आज (शुक्रवारी) सकाळी चकमक झाली. या चकमकीत 14 ते 15 नक्षलवाद्यांना ठार झाले आहे. गडचिरोलीमध्ये पोलिसांच्या सी-60 जवानांना या कार्यात यश आले आहे. 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहे तर घटनास्थळावर आत्ताही सर्च मोहीम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्रावर ग्रॅनाईट हल्ला करून पोलीस स्टेशन उडवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ग्रॅनाईटचा स्फोट न झाल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर पोलीस जवान नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. शुक्रवारी सकाळी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान पैदी जंगल परिसरात अभियान राबवत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. सुमारे एक तास झालेल्या चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. जवानांनी घटनास्थळावर शोध मोहिम राबविली असता 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहे. या चकमकीत 14 ते 15 नक्षलवादी ठार तर काही नक्षलवादी जखमी असल्याचेही पोलीस दलाने म्हटले आहे.

Exit mobile version