Thu. Sep 29th, 2022

भ्याड २६/११ मुंबई अतिरेकी हल्ल्याची १३ वर्ष

२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. २६/११ हा दिवस मुंबईकरांसह तमाम देशवासियांसाठी काळा दिवस ठरला. समुद्रीमार्गाने कुलाबा परिसरात दाखल झालेल्या पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी तीन दिवस मुंबईला वेठीस धरले होते.

आजही प्रत्येक देशवासियांच्या मनात २६/११ हल्ल्याच्या जखमा ओल्या आहेत. या लढ्यात आपल्या भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र या दहशतवादी लढ्यात भारतीय जवानांसह नागरिकांनी बलिदान दिले. तसेच या हल्ल्यात १६६ नागरिक ठार झाले तर ३००हून अधिक नागरिक जखमी झाले. खेदाची गोष्ट म्हणजे या हल्ल्यात काही परदेशी नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेलसह सहा ठिकाणांना लक्ष्य करून हल्ले केले.

मुंबईत झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि जवानांना पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेस नेते भाई जगताप यांनी शहीदांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.  यावेळी राज्यपालांसह इतर लोकांनी शहीदांच्या कुटुंबियांची विचारपूस केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘२००८मध्ये आजच्या संविधान दिनी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला. या लढ्यात आपल्या भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र लढ्यात भारतीय जवानांसह नागरिकांनी बलिदान दिले. त्यामुळे यासर्व वीरपुत्रांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे’, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.