Fri. Jun 21st, 2019

महिलेला भोवली चोरी, पोलिसाकडून लैंगिक छळ!

416Shares

एका चोरी प्रकरणी अटक केलेल्या विवाहित महिलेवर पोलीस शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चॉकलेट्सची दहा पाकिटं चोरल्याबद्दल एका विवाहित महिलेला ताब्यात घेण्यात आलं होतं. नंतर तिला सोडूनही दिलं. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन शनिवारी रात्री मधुकर कचरु आव्हाड या 48 वर्षीय पोलीस शिपायाला पवई पोलिसांनी अटक केली आहे.

 

काय घडलं नेमकं?

पिडीत महिला ही विवाहीत असून ती तिच्या पतीसोबत राहते.

भांडुप परिसरातील एका विमा कंपनीत ती सध्या कामाला आहे.

बुधवारी 6 जुलैला ती कामावरुन पवईतील डी मार्टमध्ये खरेदीसाठी आली होती.

तिथे खरेदी करताना तिने चॉकलेट्सची दहा पाकिटं चोरी करुन तिच्या पर्समध्ये लपवून ठेवली होती.

सर्व सामान घेतल्यानंतर तिने बिलाची रक्कम दिली.

सामान घेऊन ती डी मार्टमधून बाहेर जात होती.

यावेळी तिला सिक्युरिटी गार्डने चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

तिच्याकडील सामानाची बिलाची पाहणी करुन नंतर एका सिक्युरिटी महिलेने तिच्या पर्सची पाहणी केली होती.

त्यात तिला चॉकलेट्सची पाकिटे सापडली.

याबाबत विचारणा केल्यानंतर तिने ती पाकिटे चोरी केल्याची कबुली देताच त्याचे बिल भरते अशी विनवणी केली.

त्यामुळे तिला HR कार्यालयात नेण्यात आलं.

तिथेच संबंधित अधिकार्‍यांनी पवई पोलिसांना ही माहिती देऊन बोलावून घेतलं.

महिलेने चोरीची माफी मागून यापुढे अशी चोरी करणार नाही अशी ग्वाही दिली.

त्यानंतर तिचा माफीनामा घेऊन तिचे नाव, पत्ता, मोबाईल घेऊन तिला सोडून देण्यात आले होतं.

महिला अडकली दुष्टचक्रात

दुसर्‍या दिवशी तिला कार्यालयात एका इसमाचा दोन वेळा फोन आला.

ती कामात असल्याने तिने पहिला कॉल घेतला नाही.

मात्र, दुपारी आलेला दुसरा फोन घेतल्यानंतर त्यावर बोलणार्‍या मधुकर आव्हाडने तिला चोरीचे प्रकरण संपलं नसल्याची भीती घातली.

तुमचा माफीनामा अद्याप माझ्याकडे आहे, प्रकरण पूर्णपणे संपवायचे असेल तर मला भेटा असं सांगितलं.

तिने भेटण्याचं आश्‍वासन देऊन फोन बंद केला.

दुसर्‍या दिवशी ही महिला तिच्या भांडुप येथील आईच्या घरी होती.

यावेळी पुन्हा मधुकरने तिला फोन करुन पवई येथील एलएनटी गेटजवळ बोलाविले होते.

शुक्रवारी 8 फेब्रुवारीला ती त्याला भेटण्यासाठी गेली होती.

यावेळी मधुकर आव्हाडने तिला बाईकवर बसण्यास सांगितले.

त्यानंतर ते दोघेही आरे कॉलनीतील एका हॉटेलमध्ये गेले.

याच हॉटेलमध्ये त्याने तिच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत घेतली.

रुममध्ये आणल्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून मी जेव्हा जेव्हा बोलावीन तेव्हा तेव्हा तुला यावं लागेल, आली नाहीस तर तिच्यावर कारवाई करू अशी धमकी दिली.

भीतीपोटी तिनेही त्यास होकार दिला.

या घटनेनंतर ही महिला प्रचंड मानसिक तणावात होती.

तिने घरी आल्यानंतर तिच्या पतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला.

त्यानंतर ते दोघेही पवई पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी तक्रार दाखल केली.

कोण होता आव्हाड?

आव्हाड हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होता.

त्यामुळे त्याला शनिवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

चौकशीत त्याने आपला गुन्हा मान्य करत आपल्या पदाचा गैरवापर केल्याची कबुली दिली.

त्यानंतर त्याला बलात्काराच्या याच गुन्ह्यांत रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्याला रविवारी येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला कोर्टाने 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

त्याच्याविरुद्ध लवकरच निलंबनाची कारवाई होणार आहे.

पिडीत महिलेची मेडिकल झाली असून लवकरच आव्हाड याचीही मेडिकल होईल असे पोलिसांनी सांगितले.

416Shares

Leave a Reply

%d bloggers like this: