Mon. Dec 6th, 2021

महाराष्ट्र हादरला! १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

पुणे: पुण्यात महाराष्ट्राला हादरवणारी संतापजनक घटना घडली आहे. एका १४ वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून पीडित मुलीवर उपचार सुरू असल्याचे वानवडी पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे गेली होती. तेव्हा तेथील एका रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेत रिक्षात बसवलं आणि थेट एका खोलीत घेऊन गेला. तिथे तिच्यावर आठ जणांनी बलात्कार केला.

३१ ऑगस्टला ही घटना घडल्याची माहिती पीडित मुलीने पोलिसांनी दिली. याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यामध्ये सहा रिक्षाचालक आणि दोघे रेल्वेमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आठही आरोपींना काही तासात ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करत आठ आरोपींना अटक केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *