Mon. Jul 22nd, 2019

14 वर्षीय मुलीची 40 वर्षीय पुरुषाशी विवाह; पाच वर्ष अत्याचार

0Shares

पुण्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये अवघ्या 14 वर्षीय मुलीचे लग्न एका 40 वर्षीय पुरुषाशी झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. मुलीच्या कुटुंबियांना फसवून तिच्याशी लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

पुण्यात पाच वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीचे लग्न 40 वर्षीय पुरुषाशी झाले.

मुलीचे लग्न झाले तेव्हा ती सातवीमध्ये शिकत होती.

मुलीचे आई-वडील गतीमंद असून मुलगी तिच्या आजी- आजोबांकडे लातूरला राहत होती.

घराबाहेर खेळत असताना बालाजी तळपते (40) याची नजर मुलीवर पडली.

तिच्या कुटुंबाची माहिती काढत मुलीच्या आजी-आजोबांची भेट घेतली.

मुलीशी लग्न करून तिला पुढे शिकायला देईन असे म्हणत आजी-आजोबांना विश्वास घेतले.

तसेच ती सज्ञान झाल्यानंतरच शारीरिक संबंध ठेवणार असल्याचे सांगितले.

यामुळे आजी-आजोबांनी लग्नासाठी परवानगी देत बालाजी तळपतेने मुलीशी लग्न केले.

मात्र लग्न झाल्यानंतर बालाजी तळपतेने मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली.

तसेच तिच्या कुटुंबियांशी संपर्क तोडण्यास सांगितले.

मात्र धाडस करत मुलीने आपल्या मावशीला फोन केला आणि तिची यातून सुटका झाली.

आपल्या मावशी आणि काकांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस स्थानक गाठले.

पोलीस या घटनेत अधिक तपास घेत असून बालाजी तळपतेने यापूर्वीही अल्पवयीन मुलीशी लग्न केले असल्याचे म्हटलं जात आहे.

 

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: