Thu. Jul 18th, 2019

8 वर्षांच्या मुलीवर 14 वर्षाच्या मुलाने केला बलात्कार, शिर्डीतील धक्कादायक घटना

0Shares

शिर्डीत आठ वर्षाच्या एका बालिकेवर चौदा वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. पीडित बालिकेवर नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अत्याचार करणाऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काय घडलं नेमकं?

शिर्डी शहराला लागून असलेला निमगाव परिसरात मोल मजुरी करणारे कुटुंब राहते.

त्यांची आठ वर्षाची बालिका शौचालयास जात असताना शेजारी राहणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाने तिला गाठलं आणि आडोशाला नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

ही घटना संध्याकाळी सहा वाजायच्या दरम्यान घडली.

पीडीत मुलीवर नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अत्याचारी मुलाला पकडून त्याच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनला बलात्काराचा आणि बाल अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आलं असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *