Wed. Jun 23rd, 2021

मध्य रेल्वेचा कल्याण आणि डोंबिवलीकरांना दिलासा

मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवलीकर प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.या प्रवाशांसाठी आजपासून 15 डब्यांच्या लोकल दाखल होणार आहेत. यामुळे नक्कीच कल्याण आणि डोंबिवलीकरांना थोड्याफार प्रमाणात गर्दीतून दिलासा मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली या मार्गावर 15 डब्यांच्या दोन लोकल फेर्‍या सुरू होत आहेत.

कल्याण दरम्यानच्या 15 डब्यांच्या चार फेर्‍यांमध्येही वाढ करण्यात आली आहे.

रविवार 3 मार्चपासून 15 डब्यांच्या लोकलच्या दोन फेर्‍या सुरू होत आहेत.

ठाण्यापुढील प्रवाशांसाठी 15 डब्यांची लोकल सेवा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.या मागणीला यश आले आहे.

डोंबिवलीहून प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या गर्दीचा भार कल्याण, कसारा आणि कर्जत या लोकलवर पडत होता.

त्यामुळे गर्दीचे विभाजन करण्यासाठी 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मध्य रेल्वेवर 15 डबा लोकल फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे.

असं आहे नवीन फेऱ्यांचं वेळापत्रक

पहिली 15 डब्यांची लोकल डोंबिवलीहून सकाळी 6 वाजून 14 मिनिटांनी सीएसएमटीला जाणार

सीएसएमटीहून सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी 15 डब्यांची लोकल डोंबिवलीला जाणार

या दोन्ही लोकल सेवा वीकेन्डच्या दिवशी उपलब्ध

ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकावर थांबा

15 डब्यांच्या लोकलचा सीएसएमटी ते डोंबिवली सोमवार ते शुक्रवार 22 फेऱ्या, शनिवारी 16 फेऱ्या

रविवारी एकही फेरी नसणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *