Sun. May 16th, 2021

‘आर्या’ सिनेमाला झाली 15 वर्षं, काय म्हणाला ‘अल्लू अर्जुन’?

तेलुगू सिनेसृष्टीतील स्टायलिश स्टार म्हणून ओळखला जाणारा ‘अल्लू अर्जुन’चं Fan फॉलोइंग आता देशभरात आहे. धमाकेदार अ‍ॅक्शन, अफलातून डान्स आणि भन्नाट स्टाईल ही अल्लू अर्जुनची ओळख बनली आहे. मात्र ज्या सिनेमामुळे अल्लू अर्जुनला स्टारडम मिळालं, त्या सिनेमाला आज 15 वर्षं झाली. तो सिनेमा म्हणजे ‘आर्या’… या सिनेमाच्या आठवणीने अल्लू अर्जुन भावूक झाला.

आ आन्ते… गाण्यावर धरला होता सगळ्या देशाने ताल…

तेलुगू सिनेमाला एक नवा आयाम देणारा सिनेमा ‘आर्या’ हा 2004 साली रीलिज झाला.

या सिनेमात अल्लू अर्जुनने साकारलेली वेड्या प्रेमिकाची भूमिका खूपच गाजली.

आपण जिच्यावर प्रेम करतो, ती नायिका त्याच्या मित्राच्या प्रेमात आहे, हे कळल्यावर त्या दोघांची love story पूर्ण होण्याकरता धडपडणारा आणि त्याचवेळी स्वतःचं प्रेमही वारंवार दाखवणारा विक्षिप्त मात्र गमतीदार आर्या अल्लू अर्जुनने भन्नाट रंगवला होता.

या सिनेमामुळे तो स्टायलिश स्टार बनला. दिग्दर्शक सुकुमार आघाडीचा दिग्दर्शक बनला, दिल राजू मोठा निर्माता बनला. देवी श्रप्रसाद संगीतकार म्हणून नावाजला. या सिनेमातील ‘आ आन्ते आमलापूरम’ हे गाणंही तुफान गाजलं. त्याचं संगीतल, स्वर आणि या गाण्यावरील अल्लू अर्जुनचा डान्स चांगलाच लोकप्रिय झाला.

आज या सिनेमाला 15 वर्षं झाल्यावर अल्लू अर्जुनने या सिनेमाबद्दल आपल्या आठवणी जागवल्या. या सिनेमातील प्रसिद्ध ट्रॅक ‘Feel the love’ चाच उल्लेख करत अल्लू अर्जुनने आपण अजुनही ते प्रेम feel करत आहोत, असं म्हटलंय. या सिनाला 15 वर्षं झाली आहेत, यावर माझा विश्वासच बसत नाही असं त्याने म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *