धक्कादायक !16 वर्षीय मुलाचा PUBG खेळताना हृदयविकाराने मृत्यू

PUBG गेमची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून अनेक तरुणांनी या खेळापायी आपला जीव गमवला आहे. हा गेम सध्या सगळ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. असाच एक प्रकार इंदौरमध्ये घडला आहे. एका 16 वर्षीय मुलाचा सलग 6 तास पब्जी खेळण्यामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं ?
इंदौरमधील 16 वर्षीय मुलाचा PUBG गेममुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
फुरकान असे या 16 वर्षीय मुलाचे नाव आहे.
दुपारी जेवण झाल्यानंतर तो PUBG खेळत होता.
हा गेम फुरकान सलग 6 तास खेळत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
फुरकान अचानक उठून त्याच्या PUBG च्या साथीदारांवर ओरडू लागला आणि जमिनीवर कोसळला.
फुरकानला कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
फुरकानच्या मृत्यूमुळे त्याच्या भावाने PUBG गेम डिलीट केला आहे.