Sat. Nov 27th, 2021

Thomas Cook होतेय बंद, 22 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात, पण…

गेल्या 178 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मानाचं स्थान असणारी थॉमस कूक (Thomas Cook) ही कंपनी आता बंद होत आहे. आर्थिक संकटात सापडल्याने Thomas Cook कंपनीने आपला कारभार बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ब्रिटनमधील या कंपनीने आता सर्व हॉलिडे, फ्लाईट बुकिंग रद्द केलंय. त्यामुळे 22000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यातील 9 हजार कर्मचारी ब्रिटनमधील आहेत.

काय आहे समस्या!

थॉमस कूक कंपनीला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी 25 कोटी अमेरिकी डॉलरची गरज आहे.

मात्र गेल्या महिन्यात कंपनी 90 कोटी पाऊंड मिळवले.

पुढील गुंतवणुकीसाठी Thomas Cook ला सरकारची मदत हवी आहे. मात्र अजून तरी त्यांना कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही.

त्यामुळे कंपनीने सर्व holiday तसंच flight booking रद्द केली आहेत.

जगभरातली ग्राहकांना कंपनीशी संपर्क साधायचा असल्यास कंपनीनेच +44 1753 330 330 हा नंबर दिला आहे.

भारतीय कर्मचाऱ्यांनो, टेन्शन घेऊ नका!

भारतातील Thomas Cook कंपनीचा England मधील Thomas Cook PLC कंपनीशी काही संबंध नाही.

भारतातील Thomas Cook कंपनीचे हक्क कॅनडातील फेअरफॉक्स या कंपनीकडे आहेत.

त्यामुळे भारतीयांना त्याची भीती बाळगायचं कारण नाही.

असा आहे Thomas Cook चा इतिहास?

1841 साली सुरू झालेली Thomas Cook कंपनी सुरुवातीला टेंप्रेस येथील आंदोलकांना प्रवासासाठी मदत करत होती.

त्यानंतर कंपनीने आंतरराष्ट्रीय प्रवास घडवायला सुरुवात केली.

1855 साली Thomas Cook कंपनीने पहिली AC Operator सुविधा प्रवाशांसाठी सुरू केली.

1866 मध्ये या कंपनीचा विस्तार वाढत गेला आणि कंपनीने अमेरिकन ट्रिप सुरू केल्या

1872 मध्ये या कंपनीने जगभरात आपली सेवा सुरू केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *