Sun. Oct 24th, 2021

…म्हणून 18 जुलै मुंबई लोकलसाठी काळा दिवस, एकाच दिवशी 16 जणांचा मृत्यू

18 जुलै मात्र लोकलच्या इतिहासातील काळा दिवसच म्हणावा लागेल. लोकलच्या विविध विभागात तब्बल 16 जनांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहे.

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकलची ओळख असून रोज 80 लाख प्रवाशी या लोकलने प्रवास करतात. याच प्रवासा दरम्यान काही प्रवासी गर्दीमुळे लोकल मधून पडतात यात काहींचा मृत्यू होतो तर काही जखमी होतात. जून महिन्यात एकही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही हा रेल्वेच्या गेल्या काही वर्षातला महत्त्वाचा दिवस होता.रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि रेल्वे प्रशासनाने याचा गाजावाजा केला होता पण 18 जुलै मात्र लोकलच्या इतिहासातील काळा दिवसच म्हणावा लागेल. लोकलच्या विविध विभागात तब्बल 16 जनांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहे.

18 जुलै लोकलसाठी काळा दिवस

18 जुलैला रेल्वे सुरक्षा पोलीस ठाण्याचा हद्दीत 16 जणांचा मृत्यू झाला.यात कुर्ला स्थानकात 3 जणांचा मृत्यू,ठाणे स्थानकात 3 ,डोंबिवली 2 कल्याण स्थानकांत 2 जणांचा मृत्यू झाला.

तर हार्बर मार्गवरील वाशी आणि पनवेल स्थानकात प्रत्येकी 1 तसेच पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,वांद्रे, बोरिवली आणि वसई प्रत्येकी 1 असे प्रवाशी मृत्युमुखी पडले आहे.

यातील 8 मृतक प्रवाशांची ओळख पटली आहे तर 8 जणांची अजूनही ओळख पटली नाही. या मृत्यूमुळे लोकलसाठी काळा दिवस मानला जात आहे.

रेल्वे अपघातात एकाच दिवशी 16 जणांचा मृत्यू

मृतांची आकडेवारी (स्थानकांनुसार)
कुर्ला
महिला – 1
पुरूष – 2

ठाणे
पुरूष – 3

डोंबिवली
पुरूष – 2

कल्याण
पुरूष – 2

वाशी
पुरूष – 1

पनवेल
पुरूष – 1

बांद्रा
पुरूष – 1

MCT
पुरूष – 1

बोरीवली
पुरूष – 1

वसई
पुरूष – 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *