18 वर्षीय पुतण्याचा 37 वर्षीय काकूशीच प्रेमविवाह!

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील नाहद येथे 18 वर्षीय तरूणाने आपल्याच काकूसोबत प्रेमविवाह केल्याचे समजते आहे. गेल्या 2 ते 3 वर्षापासून तरूणाचे प्रेमसंबध होते. यामध्ये तरूणाचे वय 18 असून काकूचे वय 37 असल्याने दोघांमध्ये 19 वर्षाचा अंतर आहे. रविवारी ग्रामस्थांच्या साक्षीने दोघांनी मंदिरात लग्न केले आहे. विशेष म्हणजे काकूचे यापूर्वीही लग्न झाले असून तिचा पती अजूनही जिवंत असल्याने या लग्नाची चर्चा सगळीकडे होत आहे.

‘एक विवाह ऐसा भी’!

हे लग्न हिंगोली जिल्ह्यातील वसमतच्या नाहद येथे घडली आहे.

येथील एका शेतमध्येच सर्व कुटुंब एकत्र राहत होतं. या कुटुंबातील एका लहान मुलाचं आपल्या काकूशीच प्रेमप्रकरण सुरू झालं.

पुढील 2 ते 3 वर्षं हा प्रकार सुरू होता.

काका हयात होता. काकूलाही दोन मुलं होती.

तरीही दोघांमध्ये असे प्रेमसंबंध निर्माण झाले.

काकू आणि पुतण्या दोघेही लपून- छपून एकमेकांना भेटत होते.

अखेर यांची चोरी पकडली गेली. तेव्हा गावात मोठा हंगामा झाला.

अखेर या  दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं.

विवाहाच्या वेळी पुतण्याचं वय जेमतेम 18 आहे, तर त्याच्या प्रेयसी काकूचं वय आहे 37.

खरंतर हा विवाह काकाच्या पत्नीशी असल्याने शास्त्रसंमत तर नाहीच, शिवाय मुलगा 18 वर्षांचा असल्याने, काकू घटस्फोटीत नसल्याने आणि अशा अने कारणांमुळे कायद्यानेही संमत नाही.  मात्र तरीही दोघांनी लग्न केल्यामुळे तिच्या पतीने या लग्नाचा विरोध कसा केला नाही, हा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Exit mobile version