Mon. Jan 17th, 2022

18 वर्षीय तरुणी आढळली भाजलेल्या अवस्थेत ; अपघात की घातपात ?

राज्यात जळीतकांडांचं सत्र सुरूच आहे. जळीतकांडातील आरोपींना लवकरात लवकर योग्य ती शिक्षा न झाल्याने अशा आरोपींचा उन्माद प्रचंड प्रमाणात वाढत आहे. दरम्यान नुकतीच लातूरमधील जळीतकांडाची घटना उघडकीस आली आहे.

लातुरमध्ये 18 वर्षीय तरुणीचा चेहरा भाजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. लातूर शहरातील दीपज्योति नगर भागात राहणारी 18 वर्षीय तरुणी घरात एकटीच असताना अचानक घरातून धुर येत असल्याचे शेजारील लोकांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. घर उघडताच तरुणी चेहरा भाजलेल्या अवस्थेत पडलेले दिसली. तिला लातुरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात तरुणीचा चेहरा 15 % भाजला असूनसध्या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

स्टोव्हचा भड़का उडाला आणि त्यात युवतीचा चेहरा भाजल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र पीड़ित मुलीच्या जबाबा वरुनच घटनेची उकल होणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

चेहरा गंभीर भाजल्याने तिला अद्याप बोलता येत नाही. त्यामुळे पोलिसांना अजूनही या घटनेबाबत माहिती देणं कठीणच आहे. पीड़ित मुलीच्या जबाबावरुनच घटनेची उकल होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सध्या पोलिस जळीत तरुणीचा जबाब घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या जबाबानंतरच अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *