राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांकडे बनावट आधार ओळखपत्र

राज्यातील २४ लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील १९ लाख विद्यार्थ्यांकडे बनावट आधार ओळखपत्र आहेत तर २९ लाख विद्यार्थ्यांकडे आधार ओळखपत्रच नसल्याची माहिती शिक्षण विभागाने औरंगाबाद खंडपीठाने दिली आहे.