Wed. Jul 28th, 2021

धक्कादायक! 19 वर्षीय तरुणावर अनैसर्गिक अमानवीय अत्याचार

19 वर्षीय  मुलाला गावांतील तीन तरुणांनी गोड बोलून शेतात नेत मारहाण करुन तिघांनी अमानवीय आणी अनैसर्गिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी सकाळी ही घटना आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात पीडित मुलांसोबत अत्याचार करतानाचे फोटो काढण्यात आले आहेत.  या प्रकरणी तीघा आरोपी विरोधात भा.द .वी कलम ३७७,३२३ अन्वये तसेच आय टी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांना या घटनेवर बोलण्यास नकार दिला आहे.

नेमकं काय घडलं?

बीड जिल्ह्यातील पिंपळनेर  गावांतील 19 वर्षीय तरुणाला गोड बोलून शेतात नेण्यात आले.

त्या ठिकाणी बळजबरीने काठीने मारहाण करण्यात आली तर त्याच्यावर  बळजबरीने लैंगिक अत्याचार केला गेला.

विशेष म्हणजे या प्रकरणात पीडित मुलांसोबत अत्याचार करतानाचे फोटो आरोपीने काढले आहेत.

तसेच कोणाला सांगितले तर जीवे मरण्याची धमकी देण्यात आल्याचे पीडित मुलाने सांगितले आहे.

अत्याचार केलेलें फोटो सोशल मीडियावर what app ग्रुपवर निदर्शनास आल्याने या प्रकरणाला वाचा फुटली आहे.

यामध्ये पीडित मुलांच्या सांगण्यावरून तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी तीघा आरोपी विरोधात भा.द .वी कलम ३७७,३२३ अन्वये तसेच आय टी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच नराधम आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी केली जात आहे.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *