Fri. Jun 21st, 2019

19 वर्षीय तरुणीचा 25 वर्षीय युवतीवर बलात्कार, गुन्हा दाखल

554Shares

देशाची राजधानी दिल्ली ही महिलांसाठी असुरक्षितच मानली जाते. आता तर मुलींना मुलींपासूनही धोका निर्माण झाल्याचं चित्र पुढे आलंय. एका 19 वर्षीय मुलीने 25 वर्षीय तरुणीवर sex toy च्या सहाय्याने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नवी दिल्लीमध्ये घडली आहे. पोलीसदेखील या प्रकरणामुळे गोंधळून गेले आहेत.

काय आहे प्रकरण?

25 वर्षीय पीडित तरूणीने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आपल्यावर मुलीने बलात्कार केल्याची तक्रार केली होती

मात्र पोलिसांनी महिला महिलेवर बलात्कार करूच शकत नाही, असं म्हणत तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता.

मात्र आता ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

19 वर्षीय शिवानी नामक मुलगी आपल्यावर sex toy च्या सहाय्याने वारंवर बलात्कार करत होती, असा पीडितेने दावा केलाय.

शिवानी अनेकदा आपल्याला दोरखंडाने बांधून ठेवत असे, तसंच विरोध केल्यास मारहाण करत असे असंही पीडितेने म्हटलंय.

संबंधित पीडित तरूणी ही गुरूग्रामहून दिल्लीमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी आल्याचं सांगण्यात येत आहे.

दिल्लीमध्ये तिची ओळख राहुल नावाच्या व्यक्तीशी झाली.

राहुलने आपल्या मित्रांबरोबर पीडितेवर बलात्कार केला होता

तसंच या घटनेचा व्हिडिओ बनवून तो पीडितेला ब्लॅकमेल करत होता.

या मुलीला वेश्याव्यवसायही करण्यास त्यांनी भाग पाडलं होतं.

त्यातच तिची ओळख शिवानीशी झाली.

शिवानी तिच्यावर अत्यंत हिंसक पद्धतीने वारंवार बलात्कार करत होती.

पोलिसांनी अखेर शिवानीला अटक करून न्यायलयात हजर केलं. तिला सध्या न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तिच्यावर 164 आणि 377 च्या कमलांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. महिलेवर महिलेने बलात्कार केल्याचा हा देशातील पहिला नोंद झालेला गुन्हा आहे.

554Shares

Leave a Reply

%d bloggers like this: