Thu. Sep 29th, 2022

CSMT पूल दुर्घटना : देसाईला सत्ताधाऱ्यांकडून अभय ?

CSMT पूल दुर्घटनेतील दोषी असलेल्या ऑडिटरच्या भरवशावर पुन्हा मुंबईच्या पुलांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये आणला होता. मात्र आज स्थायी समिती हा प्रस्ताव चर्चेसाठी सत्ताधाऱ्यांकडून नाकारला गेला. त्यामुळे देसाईला सत्ताधाऱ्यांकडून अभय तर दिलं जात नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

ज्या देसाईंनी CSMTचा हिमालय पूल सुस्थितीत असल्याचा चुकीचा सल्ला दिला.

त्याच देसाईने इतर 16 पुलांच्य बाबतील दिलेल्या सल्ल्यानुसार दुरुस्ती करणंही चुकीचं आहे.

मात्र यावर स्थायी समितीत चर्चा होण्या ऐवजी सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे.

त्यामुळे पुलाची दुरुस्ती होणार तर नाहीच, पण धोकादायक पुलाच्या बाबातीत कोणताही निर्णय आज स्थायी समितीत झालेला नाही.

यामुळे मुंबईकरांना धोकादायक पुलावरूनच प्रवास करावा लागणार आहे.

याला सत्ताधरी जबाबदार असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

 

बनावट ठेकेदार डी डी देसाईकडून या पुलांच्या दुरुस्तीसाठी सल्ला –

 

* ग्रॅन्टरोड रेल्वेवरील पूल

 

* ऑपेरा हाऊस पूल

 

* फ्रेंच पूल

 

*  हाजीअली भुयारी मार्ग

 

* फॅाकलॅन्ड रोड (डायनाब्रिज)

 

* प्रिसेंस स्ट्रीट पादचारी पूल

 

* चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग

 

* सीएसटी भुयारी मार्ग

 

* ग्लोरिया चर्च उड्डाणपूल

 

* सीताराम सेलम वाय ब्रीज उड्डाणपूल

 

*  ईस्टर्न फ्रीवे

 

* एसव्हीपी रोड रेल्वेवरील पूल

 

* वाय. एम. उड्डाणपूल

 

* सर पी डिमेलो पादचारी पूल

 

*  डॅाकयार्ड रोड पादचारी पूल

 

* चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग

 

CSMT पुल दुर्घटनेसारखी मोठी दुर्घटना झाल्यानंतर आज स्थायि समितीत यावर चर्चा होणं गरजेचं होतं. तसंच देसाई यांच्या सल्ल्याने पूल दुरुस्तीचा प्रस्ताव रद्द करणंही गरजेचं होतं. मात्र सत्ताधाऱ्यांनी याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. यावरून सत्ताधारी शिवसेनेला मुंबईकरांची किती काळजी आहे हे दिसतंय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.