पुण्यातील पहिली ते चौथीच्या शाळा ६ डिसेंबरपासून सुरू

राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला हाेता. मात्र जगावर पुन्हा कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचे संकट ओढावल्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आता येत्या सोमवारपासून म्हणजेच ६ डिसेंबरपासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होत आहेत.
सोमवारपासून पुण्यातील पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होणार आहेत. कोरोना प्रतिबंधक नियम पाळून पुण्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता गेल्या दीडवर्षानंतर अखेर विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दार सुरू होणार आहे. याबाबतचे पत्र पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी नुकतेच जारी केले आहे.
ओमायक्रॉनमुळे राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. १५ डिसेंबरनंतर परिस्थिती पाहून शाळा सुरू होण्याचा निर्णय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितला होता. आणि आता कोरोना प्रतिबंधक नियम पाळत पुण्यातील ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत.