Wed. Jun 26th, 2019

रजनीकांत- अक्षय कुमार आमने सामने, ‘2.0’ चा भन्नाट ट्रेलर

0Shares

सुपरस्टार रजनीकांत आणि ‘खिलाडी’ अक्षय कुमार यांच्या बहूप्रतिक्षित ‘2.0’ या सिनेमाचा ट्रेलर चेन्नईत लॉन्च करण्यात आला. हा सिनेमा देशातला आजपर्यंतचा सर्वांत महागडा सिनेमा आहे. ‘यन्धिरन’ या सुपरहिट सिनेमाचा ‘टू पॉइंट झिरो’ हा दुसरा भाग आहे. ‘यन्धिरन’ हा तामिळ सिनेमा हिंदीमध्ये ‘रोबोट’ नावाने प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तडाखेबंद कमाई केली होती.

‘2.0’ चा टीझर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारतोय. अक्षय कुमारचा या सिनेमातील लूकसुद्धा चर्चेचा विषय ठरलाय.

येत्या 29 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या व्हिएफएक्सवर थोडे नव्हे तर 544 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्यात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. रजनीकांत केवळ दुहेरी भूमिकेत दिसणार आहेच. पण त्याचबरोबर त्याचा ‘चिट्टी’ हा रोबो प्रचंड संख्येत दिसतोय. अॅमी जॅक्सन या चित्रपटात नायिका आहे. स्पेशल इफेक्ट्स हे हॉलिवूडच्या तोडीस तोड वाटत आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षकांना किती आवडतोय ते 29 तारखेलाच कळेल  

  

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: