Fri. Dec 3rd, 2021

विठूरायाच्या नगरीत ‘महास्वच्छता अभियान’; 2 हजार जणांनी घेतला हातात झाडू

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

आषाढी वारीनंतर स्थानिक प्रशासनासमोर पंढरपूर स्वच्छ करण्याचं मोठं आव्हान असते.

 

दहा लाखाहून अधिक लोकांच्या वर्दळीनंतर परिसरात साचलेला कचरा एक-दोन दिवसांत स्वच्छ करणं तसं अवघडचं, पण पंढरपूर स्वच्छ व्हावे यासाठी तब्बल 12 हजार

जणांनी हातात झाडू घेत ‘महास्वच्छता’ अभियानात सहभाग घेतला.

 

‘झाडू संताचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग’ या ओळीप्रमाणे विठूरायाच्या नगरीत महास्वच्छता अभियान राबवत ‘पंढरीच्या दारी स्वच्छतेची वारीचा’ समारोप करण्यात आला.

 

यावेळी जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, झेडपी अध्यक्षांसह तब्बल 12 हजार जणांनी हातात झाडू घेत महास्वच्छता अभियानाला सुरुवात केली.

 

चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, बस स्थानकं, स्टेशन रोड, तसेच उपनगरे अशा सर्व ठिकाणी  नगरपालिकेच्या स्वच्छतादूतांनी स्वच्छतेसाठी

स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *