Thu. Jan 20th, 2022

देशात २ लाख ४७ हजार ४१७ नवे कोरोनाबाधित

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासात २ लाख ४७ हजार ४१७ नव्या कोरोनारुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची सक्रीय रुग्णसंख्या ११ लाख १७ हजार ५३१वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांचा आलेख चढताच आहे. गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात येणारी कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्याने प्रशासन चिंतेत आले आहे.

महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ४६ हजार ७२३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर फक्त मुंबईत २४ तासांमध्ये १६ हजार ४२० नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर सात कोरोनाग्रस्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत होती. मात्र पुन्हा एकदा आटोक्यात येणारी रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्याने आरोग्य प्रशासन चिंतेत आले असून नागरिकांनी खबरदारी घेत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्येतदेखील झपाट्याने वाढत आहे. देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या ५ हजाराच्या पुढे गेली आहे. तर ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच आढळले आहेत. महाराष्ट्राची ओमायक्रॉन विषाणूची रुग्णसंख्या १ हजार २८१वर पोहचली आहे. त्यामुळे कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूसुद्धा वेगाने पसरत असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *