Tue. Aug 3rd, 2021

‘ती’ अजूनही नकोशीच!

देशात ‘बेटी बचाव’साठी अनेक मोहीम राबवल्या जात असतानाच समाजात अजूनही मुलगी नकोशीच असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूरमध्ये 2 महिन्यांच्या चिमुकलीची आई- वडिलांनी हत्या केली असून जेवणात विष टाकून ते 2 महिन्यांच्या मुलीला दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रकाश पाडावे आणि जयश्री पाडावे या अशी या आई-वडिलांची नावं आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे ?

  • शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी गावात प्रकाश आणि जयश्री हे दाम्पत्य राहत असून या दाम्पत्याला प्रांजल ही पहिली मुलगी 2 वर्षांची आहे.
  • या दाम्पत्याला दुसरीही मुलगीच झाली. त्यामुळे या दाम्पत्याने दुसऱ्या मुलीची हत्या करण्याचे ठरवले. त्यांनी ऑक्टोबरमध्ये जेवणात विष टाकून त्याचा घास मुलीला भरवला.
  • विषप्रयोगामुळे चिमुरडीची प्रकृती खालावली. यानंतर दाम्पत्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
  • मात्र त्या मुलीचा मृत्यू झाला. संशय आल्याने डॉक्टरांनी शवविच्छेदनाचा निर्णय घेतला.
  • चिमुरडीच्या व्हिसेराच्या तपासणीतून विषप्रयोग केल्याचे स्पष्ट झाले. दोन महिन्यांनी हा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.

पोलिसांनी चौकशी केली असता दुसरी मुलगी झाल्याने तिची हत्या केल्याचे या निर्दयी माता-पित्याने सांगितले. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *