Tue. Sep 27th, 2022

दोन लाखांची लाच घेताना 2 अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले

दोन लाख रुपयांची लाच घेताना २ अधिकाऱ्यांना रंगेहात पकडलं गेल आहे. सिंधुदुर्गच्या लाचलुचपत अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

मालवण येथील सिंधुदुर्ग जिल्ह सहाय्यत मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त आणि परवाना अधिकारी शिवराज चव्हाण असे या अधिकाऱ्यांचे नाव आहे.

या दोन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मत्स्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

पर्ससीन मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई न करण्यासाठीच्या बोलीवर व्यावसायिकाकडून या अधिकाऱ्यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली.

ठरलेल्या रक्कमेपैकी २ लाख रुपये देण्याचं आज ठरलं होतं.

लाचेची मागणी करण्यात आलेल्या व्यावसायिकाने याबाबतची माहिती लाचलुचपत विभागाला दिली. यानुसार लाचलुतपत विभागाने सापळा रचला.

यानुसार लाचलुचपत विभागाने शनिवारी संध्याकाळी ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांना जिल्हा विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.