वीज कनेक्शन कापल्याच्या रागातून महावितरणच्या अभियंत्यांला मारहाण

महावितरण कार्यालयात अंभियंताला मारहाण केल्याची घटना घडली आहे. नाशिकमधून हा प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील भद्रकाली येथील महावितरण कार्यालयातील शशांक पेंढारकर या अभियंताला मारहाण केली आहे.
नक्की प्रकरण काय ?
सरफराज कोकणी आणि अय्युब पठाण हे दोघे हॉटेल चालक आहेत. या दोघांनी गेल्या ३ महिन्यांपासून हॉटेलचे वीजबील थकवले होते. यांच्या हॉटेलची बुधवारी सकाळी ११ च्या दरम्यान वीज जोडणी कापली.
वीज पुरवठा का खंडित केला या कारणावरुन सरफराज कोकणी आणि अय्युब पठाण या दोघांनी सहाय्यक अभियंता शशांक पेंढारकर यांना मारहाण केली.
अभियंत्याला केलेल्या मारहाणी प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 125/2002, 353,323, 504, 506, 427 नुसार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.