Mon. Oct 25th, 2021

दोन दिवसात नागपूर जिल्ह्यात 2 पोलीस कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

दोन दिवसात नागपूर जिल्ह्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या नरखेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश मोरे यांनी आत्महत्या केली होती. आज नागपूर नागपूर शहर पोलीस विभागात कार्यरत असलेले विजय धोके यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यांना कॅन्सरच्या आजाराने ग्रासलं होतं.

नागपूर शहर पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या विजय धोके यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ते 53 वर्षांचे होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे विजय ढोके हे तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते.

आज सकाळी ते नियमितपणे उठले, कुटुंबियांसोबत चहा घेतला.

मात्र, त्यानंतर घरातल्या एका खोलीत जाऊन गळफास घेतला.

काही वेळाने ही घटना त्यांच्या पत्नीच्या लक्षात आली.

कुटुंबियांनी त्यांना डॉक्टर कडे नेलं, मात्र तोवर विजय ढोके यांचा मृत्यू झाला होता.

विशेष म्हणजे काल ही नागपूर शहर पोलीस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश मोरे यांनी त्यांच्या गावातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ते नागपूर पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यामुळे दोन दिवसात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने नागपूर शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *