Tue. Aug 9th, 2022

जम्मू काश्मीरमध्ये चकमक, 2 दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सतत चकमकी सुरूच आहेत. रविवारी शोपियान जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहेत. बालाकोटमधील भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकनंतर भारताच्या हद्दीत  45 दहशतवादी घुसल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. यामध्येे जैशच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचेही सांगण्यात येत आहे. खात्मा करण्यात आलेले दोन दहशतवादी हे या परिसरात लपून बसले होते.

दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू -काश्मीर मधील  शोपियान जिल्ह्यात जवानांची दहशतवाद्यांमध्ये  चकमक झाली .

शोपियान येथे दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय लष्काराला मिळाली होती.

यानंतर जवानांनी या दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.

जवानांनी या परिसराला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली.

ही शोधमोहीम सुरू असताना जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार केला आहे.

यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक झाली.

त्यानंतर झालेल्या चकमकीत हे दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कर अधिकाऱ्याने दिली आहे.

हे दहशतवादी या परिसरात लपून बसले होते. अशीही माहीती मिळाली  आहे.

हा दहशतवादी ‘तारिक अल मुजाहिद्दीन’चा असल्याचही सांगण्यात आलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.