Tue. Oct 26th, 2021

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर येथील त्रालमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (5 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे.

या चकमकीदरम्यान 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये त्राल परिसरात मंगळवारी पहाटे चकमक सुरू झाली.

या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

यावेळी 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या 3 दिवसांपासून चकमक सुरू होती.

या चकमकीदरम्यान रविवारी (3 मार्च) 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.

मात्र दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *