Wed. Jun 19th, 2019

व्हायग्रासाठी पेटलंय ‘या’ दोन गावांत युद्ध!

0Shares

जमीनजुमल्यावरून गावागावांत होणारे वाद नवे नाहीत. मात्र उत्तराखंडातल्या दोन गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठा वाद सुरू आहे. त्यासाठी गावकरी चक्क लाठ्या घेऊन भांडायला रस्त्यावर उतरले आहेत. हा वाद मात्र ज्या गोष्टीसाठी सुरू आहे, त्याबद्दल वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या दोन गावांतला वाद सुरू आहे, तो चक्क हिमालयीन व्हायग्रासाठी.

व्हायग्रासाठी वाद?

आंतरराष्ट्रीय बाजारात हिमालयीन व्हायग्राला मोठी मागणी आहे.

या व्हायग्राला उत्तरखंडात कीडा जडी असं म्हटलं जातं.

या व्हायग्राचा मालकी हक्क आपल्याला मिळावा, यासाठी बुई आणि पाटो या गावांत अक्षरशः युद्ध सुरू झालंय.

अखेर हा वाद मिटावा यासाठी प्रशासनाला मध्ये पडावं लागलं आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने गावकऱ्यांना आवाहन केलंय.

गावामध्ये कलम 145 लागू करण्यात आलंय.

 
काय असतो हा हिमालयीन व्हायग्रा?

व्हायग्रा हा करड्या रंगाचा किडा असतो.

हा किडा हिमालयाच्या डोंगराळ भागात मिळतो.

या व्हायग्रातील काही किडे केवळ हिवाळ्यात मिळतात.

हिमालयात सुमारे 4000 मीटर उंचावर हा किडा आढळतो.

त्याची लांबी 7 ते 10 सेंटीमीटर एवढी असते.

या किड्यांना ‘यारसंगुबा’ म्हणतात. या किड्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

या किड्यांचा वापर लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या औषधींमध्ये करतात.

चीन, नेपाळ या ठिकाणी या किड्यांपासून व्हायग्रा बनवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. या व्यवसायात अमाप पैसा असल्याने गावकऱ्यांमध्ये या किड्यांसाठी युद्ध पेटलंय.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: