Jaimaharashtra news

नोटाबंदीला 2 वर्षं पूर्ण… निर्णय योग्य की अयोग्य?

नोटाबंदीला 2 वर्षं पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारकडून त्याचे फायदे सांगितले जात आहेत तर दुसरीकडे विरोधक या निर्णयावर टीकास्त्र सोडत आहेत नोटाबंदीचे काही वाईट परिणाम येत्या काळातही भारतीय जनतेला भोगावे लागतील असे सुतोवाच नुकताच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले आहे तर नोटाबंदी हे अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीतले एक महत्त्वाचे पाऊल होते असं विधान अरुण जेटलींनी केलं आहे.

नोटाबंदीच्या समर्थनार्थ लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यानी त्याचे अनेक फायदे सांगितले आहे. नोटाबंदीमुळे काळा बाजारी कमी झाली. काळा पैशाला चाप बसला आहे. करचुकवेगिरी कमी झाली आहे तर करदात्यांचे प्रमाण वाढले आहेत असं प्रतिपादन जेटली यांनी केलं आहे. तसंच नोटाबंदी नंतर घेण्यात आलेल्या अर्थविषयक निर्णयांचीही स्तुती जेटलींनी केली आहे.

नोटाबंदीचा निर्णय हा देशाच्या कोसळत्या आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या पूनर्बांधणीतले एक महत्त्वाचे पाऊल होते असे ठाम प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. फेसबुकवर नोटाबंदीच्या निणर्याच्या समर्थनार्थ पोस्ट टाकून नोटाबंदीचे आणि भाजपच्या आर्थिक धोरणाचे देशाला झालेले फायदे जेटली यांनी अधोरेखित केले आहेत.

Exit mobile version