Mon. Aug 8th, 2022

ठाण्यात स्वाईन फ्ल्यूच्या २० रुग्णांची नोंद

सध्या राज्यात सध्या स्वाईन फ्लूच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. आणखी एकाच्या मृत्यूची नोंद झाली. आहे. ठाण्यातील नौपाडा येथील स्टेशन जवळील बी कॅबीन परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. ठाण्यात स्वाइन फ्लूमुळे हा पहिलाच बळी गेल्यामुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. ठाणेकरांची धाकधूक वाढली आहे.

याआधी राज्यात सात लोकांचा मृत्यू झाला आहे. आता हा आकडा आठवर गेला आहे. दोन वर्ष कोरोनाची दोन सामना केल्यानंतर कुठे तरी आताच कोरोनाचा संसर्ग कमी झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, कोरोना पाठोपाठ आता स्वाइन फ्लूमुळे पहिला बळी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणं कोणती?

स्वाईन फ्लूची लक्षणे सामान्य तापासारखीच असतात. खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जावे.

– ताप येणे, हुडहुडी भरणे, थंडी वाजणे.

– सर्दी होऊन नाक वाहते राहणे.

– खोकला, घशात खवखव, दुखणे

– अंगदुखी तसेच डोके दुखणे

– पोटात दुखणे

– मळमळ किंवा उलटी होणे, यासाखी लक्षणे स्वाईन फ्लूमध्ये दिसू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.