Thu. Sep 29th, 2022

डिझेलच्या दरात २० पैशांची कपात

गुरुवारी पेट्रोलचे दर स्थिर असून डिझेलच्या दरात २० पैशांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल चे दर १०१.८४ रुपयांवर आहेत. तर डिझेल ८९.६७ रुपयांवरून २० पैशांनी कमी होऊन ८९.४७ रुपयांवर आहेत. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल १०७.८३ रुपयांवर तर डिझेल ९७.०४ रुपयांवर आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई या चार महानगरांपैकी पेट्रोल आणि डिझेलचे दर मुंबईत सर्वाधिक आहेत, असे सरकारी तेल शुद्धीकरण संस्थेने म्हटले आहे. मूल्यवर्धित करामुळे (व्हॅट) प्रत्येक राज्यातील इंधनाचे दर बदलत असतात.

चेन्नईत पेट्रोल १०२.४७ आणि डिझेल ९४.०२ रुपयांवर आहेत, तर कोलकत्तामध्ये पेट्रोल १०२.८ रुपयांवर आणि डिझेल ९२.५७ रुपयांवर आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमसारख्या सरकारी तेल शुद्धीकरण कंपन्या दररोज इंधनाचे सुधारीत दर प्रसिद्ध करत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती आणि रुपया आणि डॉलरचे दर लक्षात घेऊन या किमती ठरवल्या जातात.

तेल कंपन्यांनी गुरुवारसाठी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. गुरुवारी सलग ३३ व्या दिवशी पेट्रोलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र डिझेलच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घट करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी गुरुवारी डिझेलच्या किंमतीत २० पैशांची घट केली आहे. म्हणजेच, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी डिझेल २० पैशांनी स्वस्त करण्यात आलं आहे. यापूर्वी बुधवारी, म्हणजेच बुधवारी डिझेलच्या किमतींमध्ये २० पैशांची घट करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या ३३ दिवसांपासून पेट्रोलच्या किमतीत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. मुंबईमध्ये गुरुवारी पेट्रोलची किंमत १०७.८३ रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत ९७.०४ रुपये प्रति लिटर इतकी आहे.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :

शहरं    पेट्रोलची किंमत     डिझेलची किंमत
दिल्ली        १०१.८४                      ८९.४७
मुंबई         १०७.८३                      ९७.०४
चेन्नई          १०२.४९                      ९४.०२
कोलकाता    १०२.०८                    ९२.५७
बंगळुरु       १०५.२५                    ९४.८६
भोपाळ         ११०.२०                    ९८.२६
चंदीगड        ९७.९३                      ८९.१२
रांची            ९६.६८                       ९४.४१
लखनौ        १०४.२५                        ८९.८१

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.