Thu. Sep 19th, 2019

ड्रायव्हरच्या चालाखीमुळे चिखलाच्या लोंढ्यापासून वाचले 20 जणांचे प्राण

0Shares

वृत्तसंस्था, उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये 20 प्रवासी थोडक्यात बचावले. बागेश्वरकडून हल्द्वानीला जाणारी बस भुस्खलनात अडकली. भुस्खलनामुळे चिखलाचा लोंढा रस्त्यावर उतरला. याच चिखलाच्या लोंढ्यात ही बस फसली.

 

पण ड्रायव्हरनं डोकं लावून बसमधल्या 20 प्रवाशांना वेळीच बाहेर काढलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही बस चिखलाच्या लोंढ्यात 50 मीटर खोल दरीत वाहत गेली.

 

एक झाडमध्ये आल्यानं ती अडकून राहिली. सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही प्रवासी बस हल्द्वानीला रवाना झाली होती. रैखोली परिसरात आल्यावर ड्रायव्हरनं भुस्खलन होताना पाहिलं.

 

त्यानं क्षणाचाही विचार न करता बसमधल्या 20 प्रवाशांना खाली उतरवलं. सर्व प्रवाशी उतरताच चिखलाचा खूप मोठा लोंढा बसवर आदळला आणि बसला दरीत घेऊन गेला. ड्रायव्हरनं प्रवाशांना उतरवण्यासाठी जराही दिरंगाई केली असती तर खूप मोठी दुर्घटना घडली असती.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *