Wed. Jun 26th, 2019

बाळासाहेबांना जयंतीनिमित्त ‘अशी’ आदरांजली!

48Shares

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नाशिकमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. राज्यभरातून आलेल्या 200 कलाकारांनी बाळासाहेबांच्या वेगवेगळ्या छटा दाखवणारं 200 चित्रांचं प्रदर्शन भरवून बाळासाहेबांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली..

आपल्या भाषणांनी उपस्थितांच्या मनात देशभक्तीचे अंगार फुलवणारे बाळासाहेब…  भाषणापूर्वी छत्रपतींना अभिवादन करणारे बाळासाहेब.. शांत निवांत क्षणी चिंतन करणारे बाळासाहेब…. बाळासाहेबांच्या या आणि अशा अनेक छटा सध्या नाशिकमध्ये बघायला मिळत आहेत… निमित्त आहे बाळासाहेबांच्या वाढदिवसाचं…

राज्यभरातून आलेल्या 200 कलाकारांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या बाळासाहेबांच्या छबींचं प्रदर्शन शिवसेनेच्या वतीने भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाला बघण्यासाठी विद्यार्थी,  नाशिककर यांची गर्दी होत आहे.

कलाकारांनी हुबेहुब साकारलेली चित्रं बघितल्यावर बाळासाहेबच समोर असल्याचा भास होतो. इथे चितारलेले बाळासाहेब ठाकरे,  उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं थ्री डी चित्र प्रत्येकाला आकर्षित करत आहे. आपल्या मनात असलेले बाळासाहेब प्रत्येक कलाकाराने आपापल्या पद्धतीने रेखाटले आहेत. त्यामुळे कधीही न पाहिलेले बाळासाहेब याठिकाणी बघायला मिळतात.

एका कणखर नेत्यासोबतच बाळासाहेब एक हळवं व्यक्तिमत्व आणि सर्जनशील कलाकारदेखील होते. त्यामुळे एका कलाकाराला आज राज्यभरातील कलाकारांनी कलेच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे, असंही म्हणता येईल.

48Shares

Leave a Reply

%d bloggers like this: