Fri. Sep 17th, 2021

नागपुरात 2000 लीटर हातभट्टी मोहा दारु जप्त

नागपूर : शहरात 200 लीटर हातभट्टी मोहा दारु जप्त करण्यात आली आहे. राज्य शुल्क उत्पादन विभागाने ही कामगिरी केली आहे. पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील टिमकी वस्तीत हातभट्टीच्या दारुची विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली.

यानंतर राज्य शुल्क विभागाने सापळा रचून ही दारु जप्त केली आहे.

मोहाच्या दारूची वाहतूक करणाऱ्या अँपे ऑटो गाडी जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 2 लाख 14 हजार रुपये इतकी आहे.

जिल्हापरिषद निवडणूक आचारसंहिता आणि हिवाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. शहरात अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस गस्त घालत होते.

या दरम्यान गस्त सुरु असताना उमरेड मार्गावरील चांपाकडून मोठ्या प्रमाणात मोहा दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर पथकाने पाचपावली पुल या परिसरात सापळा लावला होता.

पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार त्याच क्रमांकाचा एका अँपे ऑटो तिथे आला ज्यामध्ये ठेवण्यात आलेल्या ट्यूब मध्ये 2000 लिटर मोहफुलाची दारु भरून आणण्यात आली होती.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तात्काळ कारवाई करून ऑटो चालकाला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *