Sat. Nov 27th, 2021

पाण्यासाठी 35 हजारांहून अधिक मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार

कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी मध्यम प्रकल्प गेल्या अठरा वर्षांपासून रखडला असल्याने परिसरातील तब्बल 35 हजारांहून अधिक नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय.

ग्रामस्थांचा निर्णय, ग्रामपंचायतींचा ठराव!

1996 साली धामणी मध्यम प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती.

कामाला 2000 साली सुरुवात झाली.

मात्र त्यानंतर आजपर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही.

2 वर्ष कामाला सुरुवात झाली आणि नंतर काम बंद पडलं.

परिणामी गगनबावडा, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातील 60 हून अधिक गावं आजही तहानलेली आहेत.

त्यामुळेच इथल्या गावकऱ्यांनी हा निर्णय घेऊन ग्रामपंचायतींनी तसा ठराव केलाय.

का आली ही वेळ?

ज्यावेळी धामणी मध्यम प्रकल्प मंजूर करण्यात आला.

त्या वेळेला त्याची किंमत होती 120 कोटी रुपये होती.

आता त्याची किंमत तब्बल 782 कोटी रुपये झाली आहे.

विशेष म्हणजे या धामणी मध्यम प्रकल्पाबाबतचं जे पुनर्वसन होतं तेही पूर्ण झालं आहे.

3.85 टीएमसी इतकी क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे 50 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली जाणार आहे.

तसंच 3.85 टीएमसी पैकी 2 टीएमसी पाणीसाठा हा कोल्हापूर शहराला वितरित करण्यात येण्याची तरतूदही या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

तरीही लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नाहीत.

त्यामुळेच धामणी मध्यम प्रकल्प भागातल्या तब्बल 60 गावांनी आणि त्या गावांमधल्या 35 हजार मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय.

‘सरकारी काम बारा महिने’ थांब म्हंटले जाते इथं तर तब्बल 18 वर्षे लोकांना थांबावं लागलंय.

त्यामुळे चिडलेले लोक आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांना गावागावात लावलेले बहिष्काराचे बॅनर बघूनच परतावं लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *