Fri. Nov 15th, 2019

धक्कादायक! २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

२१ वर्षीय तरुणीवर दहा जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे.

लुधियानापासून १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या इस्सेवाल गावातील सीदवान कालव्याजवळ शनिवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली.

शनिवारी रात्री पीडित तरुणी तिच्या एका मित्रासमवेत गाडीमधून चालली होती.

यावेळी  दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांची गाडी रोखली.

गाडी थांबल्यानंतर आरोपींनी गाडीवर दगड आणि विटा फेकून मारल्या आणि गाडीतील तरुणीला व तिच्या मित्राला खेचून गाडीबाहेर काढले.

या दोघांना कालव्याजवळ निर्जन स्थळी नेण्यात आले.

यानंतर आणखी सहा ते सात जणांना या ठिकाणी बोलावून या सर्वांनी मिळून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

तरुणी आणि तिच्या मित्राला रविवारपर्यंत त्याचठिकाणी बांधून ठेवण्यात आले होते.

यानंतर रुग्णालयात झालेल्या वैद्यकीय चाचणीनंतर पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झालं आहे.

आयपीसीच्या कलमांखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *