Mon. Jan 17th, 2022

मुंबईमध्ये बाळं पळवणाऱ्या महिलेला नाशिकमध्ये अटक

मुंबईतील रेल्वे स्टेशन्सवरून लहान बाळं पळवून नेणाऱ्या एका महिलेला ठाणे पोलिसांनी नाशिक येथे अटक केली. CSMT येथून त्या महिलेने पळवलेल्या 2 महिन्यांच्या बाळाचीही पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या महिलेने अशा प्रकारचे किती गुन्हे केले आहेत आणि ही महिला मुलांची चोरी करून विक्री करत होती का किंवा खंडणीसाठी ती हे काम करत होती का, याचा तपास ठाणे पोलीस करत आहे.

नेमकं काय घडलं?

CSMT वरून दोन महिन्याच्या बाळाचं अपहरण झालं होतं.

त्यानंतर यासंदर्भात रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी पोलिसांनी CSMT रेल्वे स्टेशन परिसरातील CCTV तपासले.

त्यात एक महिला दोन महिन्यांचा बाळाला उचलून घेऊन जात असताना दिसून आलं.

त्यानंतर पोलिसांनी या महिलेचे CCTV मधील फोटो काढून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले.

त्यानंतर पोलिसांना या महिलेची माहिती मिळाली.

तिला पकडण्यासाठी ठाणे पोलिसांनी एक पथक तयार केलं.

त्यांनी नाशिक येथून अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली.

या महिलेचं नाव नीलम बोरा आहे.

त्या महिलेने इतरही काही बालकांना पळवलं आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

3 फेब्रुवारी रोजी मुंब्रा रेल्वे स्थानक येथून सलमान खान या 10 महिन्याच्या मुलाचं अपहरण केलं होतं.

ठाणे पोलिसांनी या महिलेला अटक केलं आहे.

महिलेला तसंच तिच्याबरोबर आढळलेल्या बाळाला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस  पोलिसांना ताब्यात देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *