Thu. Sep 19th, 2019

22 ऑगस्टला मनसेचे ईडी कार्यालयावर शांततेत आंदोलन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहीनूर प्रकरणी ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर मनसे 22 ऑगस्टला शांततेत आंदोलन करणार आहे.

0Shares

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहीनूर प्रकरणी ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर मनसे 22 ऑगस्टला शांततेत आंदोलन करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवल्यानंतर या पार्श्वभूमीवर मनसेची बैठक आज पार पडली यामध्ये ही चर्चा झाली आहे. यामध्ये इतर पक्षातील लोकही सहभागी राहणार आहेत. किती कार्यकर्ते उपस्थीत राहतील याचा अंदाज नसल्याचंही त्यांनी म्हटली आहे.

22 ला मनसेचे शांततेत आंदोलन

बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेवून मनसेच्या आंदोलनाची माहिती दिली आहे. राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्या नंतर देशातील वातावरण तापू लागलं आहे. त्यामुळे मनसेने बैठक घेत हा निर्णय घेतला आहे.

राज यांना ईडी ची नोटीस आल्यापासून सगळ्या लोकांचे फोन येत आहेत. राज ठाकरे यांनी ईव्हीएमबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर लोकांमध्ये प्रेम वाढले आहे. 22 ऑगस्टला मनसे शांततेत आंदोलन करणार आहे. यावेळी बाळा नांदगावकर यांनी 22 तारखेला कोणताही गोंधळ गडबड न करता ईडी कार्यालयात यायचं आहे. असे आवाहन देखील केले आहे.

केवळ मनसे कार्यकर्ते नाही तर इतर ही लोक येऊ शकतात. म्हणून मुद्दाम आमच्या पक्षाला गालबोटं लावण्यासाठी किंवा जाणूनबुजून आमच्या पक्षला बदनाम करण्यासाठी कोणीही काहीही करू शकतात. असा आरोपही त्यांनी केला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *