Sun. Oct 17th, 2021

काँग्रेसला धक्का, 22 मंत्र्यांचे राजीनामे

मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप घडला आहे. काँग्रेसला पक्षाला मध्य प्रदेश मोठा धक्का लागला आहे. कमलनाथ सरकारमधील एकूण 22 मंत्र्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत.

या 22 मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने काँग्रेस अडगळीत सापडली आहे.

भाजपने कर्नाटकमध्ये फोडाफोडी करून सत्ता मिळवली. भाजपने यानंतर आपला दौरा मध्य प्रदेशकडे वळवला. यामुळे मध्य प्रदेशातील राजकाराणाला वेग आलाय.

मध्य प्रदेश सरकारमधीर निवडक मंत्री हे बंडखोरीच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच काँग्रेसचे 6 मंत्री आणि 11 आमदार बंगळुरुत असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान हे सर्व मंत्री आणि आमदार नेमके कुठं आहेत, याची निश्चित माहिती नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *