जिम चालकांना मोठा दिलासा
अखेर राज्य सरकारची राज्यातील जिम सुरु करण्यास परवानगी…

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात तसेच देशात टाळेबंदी करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने टप्याटप्याने सर्व गोष्टी चालू करण्याचा निर्णय दिला गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जिम चालू करण्याची मागणी करत होते परंतु अखेर राज्य सरकारने राज्यातील जिम सुरु करण्यास मान्यता दिली. २५ ऑक्टोबर पासून राज्य सरकारने परिपत्रक जारी करून जिम चालू करण्यास परवानगी दिली आहे.

एसओपी (मार्गदर्शक सूचना) पालन करूनच जिम सुरु करता येणार आहेत पण कंटेन्टमेंट झोन वगळून जिम सुरु करण्याचे स्पष्ट केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वात आधी जिम सुरु करण्याची मागणी केली होती त्यानंतर जिम चालकांनी राज ठाकरेंना भेटून जिम सुरु करण्याची मागणी करत होते तसेच मुख्यमंत्र्यांना भेटूनही मागणी केली होती त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिम चालकांना एसओपी सादर करावी असे स्पष्ट केले होते पण अखेर जिम सुरु करण्याचा निर्णय देऊन जिम चालकांना मोठा दिलासा भेटला आहे.