Sun. Jun 20th, 2021

२५ हजार खासगी इंग्रजी शाळा आज बंद राहणार

शिक्षण हक्क अंतर्गत घेण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी घोषित केलेल्या निधी प्रमाणे उपलब्ध करून न दिल्यामुळे आज राज्यातील २५ हजार खासगी इंग्रजी शाळा बंद राहणार असल्याचे समोर आले आहे. तसेच राज्य सरकारने शाळांना ४०७ कोटी उपलब्ध करून देत शाळा बंद आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली आहे. ९०० कोटींपैकी ६०० कोटी न मिळाल्याने राज्यातील २५ हजार खासगी इंग्रजी शाळा बंद राहण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

शिक्षण हक्क अंतर्गत ९०० कोटींचा निधी देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच ९०० कोटींपैकी फक्त ४०७ कोटी मंजूर केला आहे.

मात्र मंजूर केला असला तरी तो अद्याप मिळालेला नाही.

घोषित  केलेल्या निधीमधून ६०० कोटी निधी प्रलंबित आहे.

९०० कोटींपैकी ६०० कोटी प्रलंबित असून इतर मागण्यांबाबत सकारत्मक चर्चा न झाल्याने शाळा बंद आंदोलन करण्याचे निर्णय घेतला.

शिक्षण हक्क अंतर्गत विद्यार्थ्यांमागे १७ हजार ७०० शुल्क सरकारकडून उपलब्ध होतो. मात्र शाळेचे शुल्क जास्त असल्यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो.

यासाठी सुद्धा हे आंदोलन कायम ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आंदोलनचा परिणाम बोर्डाच्या परीक्षांवर होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नेमक्या मागण्या काय ?

सिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाला शाळा सुरक्षा कायदा लागू करवा.

जर स्कूल बसचा अपघात होतो तर मुख्यध्यापकाला जबाबदार न ठरवता वाहतूक व्यवस्थापकाला जबाबदार ठरावे.

या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होत नसल्याने आम्ही शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *