Sat. Jul 4th, 2020

मोदी सरकारच्या योजनेनुसार सांगलीतील BSNL च्या 253 कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती

मोदी सरकारच्या योजनेनुसार सांगली जिल्ह्याच्या BSNL विभागातील 253 कर्मचाऱ्यांनी आज स्वेच्छानिवृत्ती (VRS) स्वीकारली आहे. BSNLच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही निवृत्त होत असल्याच्या भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

स्वेच्छा निवृत्ती स्वीकारलेल्यांमध्ये उप प्रबंधक पदापासून ते लाईनमन पदापर्यंतच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

आज या 253 कर्मचाऱ्यांना BSNL प्रशासनाकडून निरोप देण्यात आला. यानिमित्त आयोजित निरोप समारंभास सर्व कर्मचारी कुटुंबियांसह हजर होते.

BSNL सध्या अडचणीत आहे त्यामुळेच आम्ही BSNL च्या उज्वल भविष्यासाठी स्वेच्छा निवृत्ती घेत आहोत अशी भावना निवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

सांगली बीएसएनएल विभागात एकूण साडेचारशे कर्मचारी काम करत होते.

यामध्ये आता 253 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.

त्यामुळे आता उर्वरित 150 कर्मचाऱ्यांवर BSNL ची मदार असणार आहे.

नव्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासंदर्भात कोणतीही चर्चा नसल्यामुळे  अपुऱ्या स्टाफच्या जोरावर BSNL चा कारभार चालवावा लागणार आहे. यामुळे BSNL ला ग्राहकांना सेवा देण्यामध्ये अडचणी येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *