Thu. May 13th, 2021

शिवसैनिक नाराज; शिवसेनेच्या 26 नगसेवकांनी दिले राजीनामे

विधानसभा निवडणुका तोंडावर ठेपल्या असून एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. कल्याण पूर्व या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला संधी दिल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करत भाजपाचे उमेदवार गणपत गायकवाड यांचा विरोध केला आहे. यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून  26 नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

नेमकं काय घडलं ?

कल्याणमध्ये भाजपाच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे शिवसैनिक प्रचंड नाराज झाले आहेत.

त्यामुळे धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करत उमेदवारी मिळवली आहे.

पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून कल्याणमधील 16 नगरसेवक आणि उल्हासनगरमधील 10 नगरसेकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

26 नगरसेवक आणि 300 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे.

धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करत उमेदवारी मिळवल्याने भाजपाचे उमेदवार गणपत गायकवाड नाराज झाले आहे.

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे बोडारे कट्टर समर्थक आहेत.

श्रीकांत शिंदे यांच्या पाठिंबा शिवाय बोडारे यांनी बंडखोरी केली नसल्याचे गायकवाड यांच्या समर्थकांनी म्हटलं आहे.

पालकमंत्री यांच्यावर टीका केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना राग आला असून बोडारे यांना पाठिंबा देण्याचे शिवसैनिकांनी ठरवले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *